esakal | वसईच्या कौशिक जाधव यांनी फळ-भाज्यांवर रेखाटले अष्टविनायक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

वसईच्या कौशिक जाधव यांनी फळ-भाज्यांवर रेखाटले अष्टविनायक

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : गणपती म्हणजे सर्व विद्यांचा अधिपती ,याची विविध रूपे आतापर्यंत साकारली गेली आहेत. कधी दगडावर याची मूर्ती कोरली गेली आहे तर कधी चित्रातून बाप्पा आपल्याला भेटतो वसई च्या भाताने गावातील चित्रकार कौशिक जाधव (Kaushik Jadhav) याने हि असाच बाप्पा चितारला आहे. तो चक्क फळभाज्यांवर.कौशिकने अष्टविनायकांचे चित्र रेखाटले आहे ते टोमॅटो (Tomato) , कोबी (Cabbage), भोपळी मिरची (Pumpkin Chili), वांगी, कांदा (Onion) , फ्लॉवर, बटाटा (Potato) , गाजर व आलं अश्या फळभाज्यांवर (fruits vegetables) त्याने रेखाटलेली चित्रे आकर्षित करणारी आहेत.

Mumbai

Mumbai

कौशिकणे हि चित्रे वॉटर कलर वापरून अष्टविनायक साकारले आहेत. कौशिक जाधव या तरुणाला चित्रकलेची आवड असून तो गावागावांत आपली कला इतरांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. कागदावर सहजरित्या रंगांचा वापर करून चित्र काढता येतात मात्र हीच चित्र किंवा संकल्पना फळ भाज्यांवर रेखाटण्याचा त्याचा अनोखा प्रयत्न होता.. यापूर्वी या चित्रकाराने ९ ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या दिवशी दगडांवर चित्र रेखाटून क्रांतीवीरांना अनोखी मानवंदना दिली होती.. त्यानंतर त्याने भाज्यांवर रेखाटलेले चित्र सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलाय..त्यांच्या या कलेचे कौतुक बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील व भाताणे गावचे उपसरपंच.

Mumbai

Mumbai

प्रणय कासार व तानसा ग्लोबल स्कूल व न्यू इंग्लिश स्कुल, वसईच्या शिक्षकांनी कौतुक केले आहे. तानसा ग्लोबल स्कूल चे चेअरमन मंगेश चौधरी व मुख्याद्यापक दयानंद सर , .प्रा. अभिजीत ऐवळे व न्यू इंग्लिश स्कूल चे कला शिक्षक अभिमन पाटील आणि न्यू इंग्लिश स्कूल, वसई च्या मुख्याध्यपिका.सौ.एस. एल वाझ यांनी केलेल्या कौतुकाने कौशिक ने आपण अजून या कलेत वेगवेगळे प्रयोग करत राहणार असल्याचे सकाळशी बोलताना सांगितले.

mumbai

mumbai

loading image
go to top