esakal | कोरोनामुळे CAची अंतिम परीक्षा पुढे ढकलली

बोलून बातमी शोधा

The Institute of Chartered Accountants of India
कोरोनामुळे CAची अंतिम परीक्षा पुढे ढकलली
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे देशभरात घेण्यात येणारी सीएची अंतिम परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना देशातील एकूणच परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर त्याबद्दलची माहिती दिली जाईल असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: Prime Criticare Hospital:ठाण्यात रुग्णालयाला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू

सीएची 21 मे रोजी अंतिम आणि 22 मे रोजी इंटरमेडिएटची परीक्षा देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरू असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील परीक्षेची तारीख निश्चित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना किमान 25 दिवस अगोदार माहिती दिली जाईल, आणि अधिकची माहिती ही वेळोवेळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल असेही कळविण्यात आले आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

ca inter final exam 2021 postponed in view of covid19