'तो' कोरोनाबाधित कॅब ड्रायव्हर मुंबईतला; पुण्यानंतर कोरोना मुंबईत ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या थेट 5 वर गेल्याने महाराष्ट्र सरकार घरबरदारीच्या उपाय योजना ठरविण्यासाठी उद्या ता. 11 रोजी मंत्रिमंडळाच बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधिचे आदेश दिले असून आयपीएल सामन्यांबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाईल. सामने घेऊ नये, असा विचार समोर आला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशनही गुंडाळावे असाही प्रस्ताव समोर आला आहे. 

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या थेट 5 वर गेल्याने महाराष्ट्र सरकार घरबरदारीच्या उपाय योजना ठरविण्यासाठी उद्या ता. 11 रोजी मंत्रिमंडळाच बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधिचे आदेश दिले असून आयपीएल सामन्यांबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाईल. सामने घेऊ नये, असा विचार समोर आला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशनही गुंडाळावे असाही प्रस्ताव समोर आला आहे. 

पुण्यातील 2 प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्‍सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला तो टॅक्‍सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात 309 पैकी 289 जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

डेटॉलने हातपाय धुतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात?

दरम्यान, 10मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत विमानांमधील 1 लाख 29 हजार 448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत. 

18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12जण पुणे येथे तर 3 जण मुंबईत भरती आहेत. 

कोरोना प्रतिबंधासाठी HIV ची लस ठरतेय गुणकारी ?

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502बेडस उपलब्ध आहेत. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर 12 मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 591 प्रवाशांपैकी 353प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

cab driver from mumbai found positive in corona test


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cab driver from mumbai found positive in corona test