कोरोना प्रतिबंधासाठी HIV ची लस ठरतेय गुणकारी ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई - कोरोनाचं संकट जगभरावर आहे. अशात कोरोना भारतातही पसरणार की काय अशी भीती निर्माण होतेय. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही कोरोना बाधित पॉझिटिव्ह केस नव्हती, मात्र आता पुण्यात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. यामुळे आता काळजी वाढलीये. पुण्यातील व्हायरॉलॉजि सेंटरमध्ये आता या दोन कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने पाठवण्यात आलेत. भारतात कोरोनावर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातायत. अशातच याबाबतच्या औषधोपचाराबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येतेय.  

मोठी बातमी - कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की 'काय' होतं, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

भारतात जयपूरमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित इटालियन रुग्णांवर HIV मध्ये देण्यात येणाऱ्या रिटोनावीर/लोपिनावीर औषंधाचा वापर केल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान HIV प्रतिबंध लस वापरण्याची योग्य ती परवानगी घेऊनच ही लस रुग्णांना देण्यात आल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आलीये. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनीदेखील माहिती दिलीये. “करोना व्हायरसच्या रुग्णांवर HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी ICMRA ने परवानगी घेतली आहे. इमर्जन्सीमध्ये लोपिनावीर/रिटोनावीर औषधांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.” असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हणटलंय. 

मोठी बातमी -  ...जमिनीवरच सतरंजी पसरवून आमदार साहेब झालेत गुडूप, कार्यकर्ते आश्चर्यचकित !

जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. चीनमध्ये सर्वात जास्त नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. चीन पाठोपाठ इटली आणि त्यानंतर इराणचा नंबर लागतो. अशात दरम्यान HIV च्या औषधांचा कोरोनावर परिणाम होईलच यावर आताच भाष्य करणे कठीण असल्याचं एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेत. याचसोबत HIV औषधांचा शरीरावर वाईट परिणाम देखील असल्याचं त्यांनी सांगतिलंय. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्रातून सर्वात आधी माहिती देण्यात आलीये. 

to control corona HIV doses are being given to corona positive cases

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to control corona HIV doses are being given to corona positive cases