

Big Move for Clean Rivers: ₹2000 Crore Fund to Restore Key Water Bodies
sakal
मुंबई : राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करणे आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री राहणार असून उपाध्यक्षपदी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री असतील. वित्त मंत्री, नगरविकास मंत्री, जलसंपदा मंत्री, उद्योग मंत्री, ग्रामविकास व पंचायतीराज मंत्री या प्राधिकरणाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.