Sanjay Shirsat: मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार; मंत्रिपदासाठी इच्छुक शिरसाटांनी तारीखही सांगून टाकली

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार यांच्या मंत्रिपदाबाबतही भाष्य केलं आहे.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatesakal
Updated on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही, असं सांगताना त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची तारीखही सांगितली आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Cabinet expansion will have to be done Sanjay Shirsat reveal date also)

Sanjay Shirsat
Urfi Javed Controversy : 'आता चित्रा वाघ गप्प का?'; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

शिरसाट म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे आणि मागणी सुध्दा आहे. कामाचा वेग वाढावा यासाठी हे आवश्यक आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमत्र्यांना सांगितलं आहे, त्यावर त्यांनी यातील ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्या सांगितल्या. या तांत्रिक अडचणी १५ तारखेपर्यंत संपतील असा आम्हाला अंदाज आहे.

Sanjay Shirsat
Sanjay Raut : 'शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, 16 आमदार अपात्र ठरतील'

मंत्रिमंडळात अनेक राज्यमंत्रीपदं असतील कॅबिनेट मंत्रीपदं बाकी आहेत. २० लोकांमध्येच मंत्रिमंडळ चालणार नाही. यात वाढ करावीच लागणार आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल हे कोणालाही थांबवता येणार नाही. फक्त काही गोष्टींमुळं हे थांबलेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही असं नाही करावचं लागणार आहे, हे मी ठामपणे सांगतो. येत्या २०-२२ तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा माझा एक अंदाज आहे, सर्वांनाच ती अपेक्षा आहे, असंही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com