Urfi Javed Controversy : 'आता चित्रा वाघ गप्प का?'; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Controversy

Urfi Javed Controversy : 'आता चित्रा वाघ गप्प का?'; उर्फीने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीची पोलिसांत आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यावर उर्फीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिली आहेत. त्यांच्यातील हा वाद आता चित्रा वाघ, उर्फी जावेद यांच्यापुरताच न राहता त्यामध्ये आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश झाला आहे.

अशातच आता उर्फीने भाजपच्या एका महिला नेत्याने पक्ष सोडला त्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. भाजपच्या तामिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघुराम यांनी भाजप पक्षाला रामराम केला आहे. गायत्री यांनी सांगितले की, भाजप पार्टी महिला सुरक्षित नाहीत,म्हणून मी पार्टी सोडत आहे असं कारण त्यांनी पक्ष सोडताना दिलं आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

उर्फी जावेदने त्यांची ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला आहे. उर्फीने लिहिले आहे की, 'आता चित्रा वाघ गप्प का आहेत! यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत. तुमच्याच पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे! जिथे आवाज उठवायला हवा तिथे आवाज नाही उठवणार' असं म्हणत तिने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

हेही वाचा: Manjiri Prasad Oak: प्रिय प्रसाद! तू म्हणशील तसं.. मंजिरीनं नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट..

राज्यात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यावतील वाद चांगलाच रंगू लागला आहे. अनेकजण म्हणत आहेत की चित्रा वाघ यांनी चुकीच्या मुलीशी पंगा घेतला आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडे देखील उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु उर्फीने तिला विनाकारण त्रास देत असल्याचे म्हणत महिला आयोगाकडे दाद मागितली. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने समर्थ दिले नाही. त्याउलट चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडून नोटिस देण्यात आली आहे.

हेही वाचा: Urfi Javed: 'म्हणूनच मी पूर्ण कपडे घालत नाही', शेवटी ऊर्फीनं सांगितलं कारण