esakal | उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - उद्या 19 तारीख, तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करावी का तारखेप्रमाणे यामध्ये अनेक मतभेद आहेत. शिवसेनेच्या भूमिकेप्रमाणे शिवजयंती तिथी प्रमाणे साजरी करणं योग्य आहे. तर अनेकांना शिवजयंती ही तारखेप्रमाणे साजरी व्हायला हवी असं वाटतंय. दरम्यान, शिवजयंतीवरून कायम वादविवाद होणं काही नवीन नाही. यंदा देखील हा वाद उफाळून आला. मोठी बॅनरबाजी देखील झाली. मात्र यंदा या वादासोबत आणखीन एक वाद उफाळून आलेला पाहायला मिळतोय, तो म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा.

मोठी बातमी - नवी मुंबईत भाजपच्या 4 नगरसेवकांचा राजीनामा, आणखिन 5 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत...

उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे. महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एक निर्णयामुळे अनेक नेते दुखावले गेल्याचं बोललं जातंय. संपूर्ण राज्यभर उदया शिवजयंती साजरी होत असताना मंत्री मात्र नाराज आहे. मुख्यमंत्र्यांनी उदया कॅबिनेट बैठक बोलवल्यामुळे सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण अनिवार्य आहे. यामुळे मंत्र्यांना पूर्णवेळ त्यांच्या मतदार संघात जाणे शक्य नाही. यामुळे त्यांनी नाव न सांगण्यांच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी घ्यावी किंवा गुरुवारी घ्यावी असं काही नेत्यांचं म्हणणं आहे.

मोठी बातमी - तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी 5 वाजता सह्याद्रीवर बोलावलेल्या बैठकीमुळे सकाळच्या वेळी मंत्री आपल्या मतदारसंघात नागरिकांसोबत वेळ घालवून नंतर बैठकीला हजर राहणार आहेत. 

cabinet meeting on shivajayanti many ministers are unhappy says sources

loading image
go to top