esakal | तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - Google प्ले स्टोअरवरील अनेक ऍप्लिकेशन आपण दररोज वापरतो. काही उत्तम निघतात, आपल्या गरजा पूर्ण करणारे असतात तर काही अगदीच बकवास निघतात. पण आज आम्ही तुम्हाला असं एक ऍप्लिकेशन सांगणार आहोत ज्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या प्रायव्हेट गोष्टी ऐकल्या जातात, त्यावर नजर ठेवली जाऊ शकते. होय म्हणजेच तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यावर हेरगिरी केली जातेय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. या ऍप्लिकेशनचं नाव आहे टू टॉक (To Tok)

या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांवर नजर ठेवली जाऊ शकते. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही कुठे जातात, तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे, कुणाचे फोटो आहे, कुठे फिरायला गेलेला, वैय्याक्तिक जीवनात तुम्ही काय करतात याची सर्व माहिती पळवली जाऊ शकते.

मोठी बातमी देवेंद्र फडणवीस पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले चॅलेंज 

तुम्ही कधी टेलिग्राम हे ऍप्लिकेशन वापरलं असेल तर याची तुम्हाला कल्पना येऊ शकते. काहीसं टेलिग्रामसारखं हे  ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनला भारतातून जास्त मागणी नसली तरीही हे ऍप्लिकेशन UAE, युरोप, आशिया खंडातील इतर देश आणि उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून सौदी अरेबियातील सरकारकडून त्यांच्या देशातील नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात होता असं बोललं जातंय. 

या ऍप्लिकेशन माध्यमातून स्नुपिंगचे आरोप केले गेल्यानंतर गूगल प्ले स्टोअरमधून हे ऍप्लिकेशन हटवण्यात आलंय. दरम्यान, हे ऍप्लिकेशन ज्यांनी डिलीट केलंय त्यांचा देखील डेटा सुरक्षित नाही असं बोललं जातंय. या ऍप्लिकेशनला ब्रिज होल्डिंग नामक कंपनीने तयार केलंय. गुगलकडून हे ऍप आता हटवण्यात आलंय. 

मोठी बातमी  - त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

तुम्हाला जर असे नवनवीन ऍप्लिकेशन्स वापरायला आवडत असतील तर त्याखालील रिव्ह्यू वाचून मगच त्यांचा वापर करा. नाहीतर तुमची महत्त्वाची माहिती कधी चोरी होईल कळणार देखील नाही.  

google play store removes this malicious application known for snooping

loading image