आज वर्षा बंगल्यावर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची बैठक

पूजा विचारे
Friday, 23 October 2020

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याकारणानं ही बैठक वारंवार लांबणीवर पडली होती. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईः राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याकारणानं ही बैठक वारंवार लांबणीवर पडली होती. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी ही बैठक होणार होती. मात्र अजित पवारांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ही बैठक काल म्हणजेच गुरुवारी आणि आज रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

सरकारला राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. त्यावेळी सरकारकडून अजित पवार यांच्या प्रकृतीचं कारण देण्यात येत होते. मात्र ही बैठक आजच पार पडणार आहे. तसंच या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

अधिक वाचा-  'पप्पू' ट्विट कंगनाला पडणार महागात, आणखी एक फौजदारी तक्रार दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरला जाऊन पाहणी दौरा केला. त्यावेळी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं. मात्र गुरुवारी आयोजित केलेली बैठक रद्द केली गेली. बैठक रद्द होताच ही बैठक शुक्रवारी होणार असं सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही आज आयोजित केलेली मंत्रिमंडळाची बैठक पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

मुंबईतल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाविकास आघाडी सरकारकडून अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जवळपास तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे सरकारच्या पाहणीत राज्यभरातील जवळपास १० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. 

Cabinet meeting Varsha Bungalow today help the flood-hit area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet meeting Varsha Bungalow today help the flood-hit area