'मानवतेच्या भावनेतून त्यांचा गुन्हा मागे घ्या'; पवई पोलिस मारहाण प्रकरणी राम कदमांचा फोन

तुषार सोनवणे
Monday, 11 January 2021

पवई पोलिस ठाण्यातील येथील नितिन खैरमोडे यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे भाजपनेते राम कदम यांनी आरोपींवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पोलिसांना फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मुंबई - पोलिसांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्का दायक घटना पवई येथे घडली आहे. दिपू तिवारी, सचिन तिवारी, आयुष यांच्याकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली.. पवई पोलिस ठाण्यातील येथील नितिन खैरमोडे यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे भाजपनेते राम कदम यांनी आरोपींवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पोलिसांना फोन केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

 

पवईतील हिरानंदानी या परिसरात एका वृद्ध महिलेला तिघा दुचाकीस्वारांनी धडक दिली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेशी या दुचाकीस्वारांनी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यावेळी पोलिस हवालदार नितिन खैरमोडे आणि इतर पोलीस तेथे पोहचले. पोलीस या तिघांना ठाण्यात घेऊन जात होते. रिक्षाने पोलीस ठाण्यात जात असतानाच या तिघांनी नितिन खैरमोडे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर दुखापत झाली आहे. दरम्यान, तिघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघे पळून जाण्यास यशस्वी ठरले. परंतु त्यातील सचिन तिवारी यांस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांना फोन केला. ' त्या आरोपींकडून झालेल्या चुकीचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु माणुसकीच्या भावनेतून त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, त्यांच्याकडून झालेला गुन्हा हा अजानतेपणातून झाला आहे. खरं तर मी लोकप्रतिनिधी म्हणून हे सांगणं देखील चूक आहे. मी या चुकीचं समर्थन अजिबात करत नाही. परंतु त्या तरुणांच्या करीअरचा प्रश्न आहे.'  असे राम कदम यांनी खैरमोडे यांना म्हटले.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिस हवालदार खैरमोडे यांनी देखील कदम यांना उत्तर दिले की, 'महाराष्ट्र पोलिसांवर हात उचलण्याची हिम्मत करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला हवी. त्यांना सोडून दिले तर समाजात चूकीचा संदेश जाईल. ' 

मात्र राम कदम यांनी वृद्ध महिलेशी हुज्जत घालणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना पाठिशी का घालावं असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

call of Ram Kadam in Powai police assault case

-----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: call of Ram Kadam in Powai police assault case