
मुंबई : महिला आणि नवजात बालकांच्या उपचारांसाठी समर्पित असलेल्या कामा अँड आल्ब्लेस रुग्णालयात जन्मलेल्या १६ टक्के नवजात बालकांमध्ये श्रवणदोष असल्याचे आढळून आले आहे. या सर्व बालकांना योग्यरित्या ऐकू यावे यासाठी उपचार सुरू करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की, जगभरातील प्रत्येक १,००० नवजात बालकांपैकी तीन बालकांमध्ये श्रवणदोष आहे. भारताचे २०११ चे आकडेही याच्याशी जुळतात.