मेट्रो लाईन 2 बीमधून दोन स्थानके रद्द; माहिती अधिकार कार्यकर्त्याने नोंदवला आक्षेप

तेजस वाघमारे
Thursday, 17 September 2020

एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे पसरवण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बी. डी. एन. नगर ते मंडाळे या मेट्रो लाईन 2 मधील कुर्ला आणि एमएमआरडीए अशी दोन स्थानके वगळण्यात आली आहेत

 

मुंबई : एमएमआरडीएमार्फत मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे पसरवण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत बी. डी. एन. नगर ते मंडाळे या मेट्रो लाईन 2 मधील कुर्ला आणि एमएमआरडीए अशी दोन स्थानके वगळण्यात आली आहेत. रेल्वे स्थानक उभारण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने ही स्थानके रद्द करण्यात आली आहेत.

BMCतील समित्यांच्या निडणुकीत भाजपची भूमिका निर्णायक! विरोधकांची बार्गेनिंग पावर वाढणार

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारीनुसार मेट्रो लाईन 2 बी ही पश्चिम आणि पूर्व उपनगराला जोडणारी असून, कुर्ला स्थानक हे महत्त्वाचे आहे. मेट्रो 2 बीचा डीपीआर आणि निविदेत कुर्ला स्थानक आहे; पण आता हे स्थानक वगळण्यात येत आहे. अन्य बीकेसी स्थानक हे एकत्रित करण्यात येत आहे.
कुर्ला स्थानक हे कुर्ला टर्मिनससाठी महत्त्वाचे आहे. एमएमआरडीएचा हेतू खरोखरच प्रामाणिक असेल, तर जाहीर नोटीस देऊन नागरिकांच्या सूचना, हरकती आणि आक्षेप का मागविले नाही? असा सवाल गलगली यांनी केला आहे. तसेच, रेल्वे टर्मिनसला 2 बी मेट्रो जोडण्यासाठी एमएमआरडीएने प्राधान्य का दिले नाही? ही चौकशीची बाब आहे, असे गलगली यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेला अद्यापही कोरोनाचा धोका; वाढ मंदगतीनेच होणार; रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास यांचे मत

मेट्रो 2 बी मार्गावर 22 स्थानके प्रस्तावित होती. त्यापैकी एमएमआरडीए आणि कुर्ला पश्चिम ही स्थानके काही तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली आहेत, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancellation of two stations from Metro Line 2B