esakal | कर्करोग निदानासाठी प्रशासनाने उचलंल 'हे' पाऊल!
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगावरील उपाययोजनेसाठी प्रशासनाने उचलंल 'हे' पाऊल!

कर्करोगाचे गांभीर्य ओळखून नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभाग, आरोग्य विभाग, इंडियन कॅन्सर सोसायटी, मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्करोग निदानासाठी प्रशासनाने उचलंल 'हे' पाऊल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सध्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्याकडे गांभीर्याने व काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे. कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियमित वाढीमुळे उद्‌भवणारा रोग असून, तो शरीराच्या कोणत्याही पेशी, अवयवामध्ये होऊ शकतो. हेच गांभीर्य ओळखून नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभाग, आरोग्य विभाग, इंडियन कॅन्सर सोसायटी, मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी कर्करोग निदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बातमी वाचली का? रायगड जिल्ह्यात म्हणून आहे, हुडहूडी

हे कर्करोग शिबिर प्रभागनिहाय घेण्यात येणार असून, प्रत्येक शिबिरामध्ये १०० महिलांची प्राथमिक कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे. महिलांमध्ये प्रामुख्याने मुख कर्करोगाच्या लक्षणात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळही न बरा होणारा व्रण, जखम, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडात लालसर पांढरा चट्टा, जेवण्यास/चावण्यास गिळण्यास त्रास होणे, जीभ हलविण्यास, बोलण्यास त्रास होणे, सतत तोंडाला खराब वास येणे, तोंडात आकाराने वाढत जाणारी गाठ, जबड्यात/जिभेत/ गालांत तीव्र वेदना, जिभेवर व ओठांवर बधिरपणा, आवाजात बदल होणे ही लक्षणे असतात. याशिवाय गर्भाशय तोंडाचा कर्करोगाच्या लक्षणात- योनी मार्गातून मासिक पाळी बाह्य अनियमित रक्तस्राव होणे, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव किंवा योनीमधून येणारा दुर्गंधीयुक्त रक्तमिश्रित स्राव, शारीरिक संबंधाच्या वेळी किंवा नंतर होणारा रक्तस्राव अशी लक्षणे दिसून येतात. स्तन कर्करोगाच्या लक्षणात- स्तनामध्ये किंवा काखेत गाठ येणे, सूज येणे, स्तनाच्या त्वचेवर डाग किंवा खड्डा पडणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनात दुखणे, स्तनामधून पाणी किंवा रक्त वाहणे ही लक्षणे आढळतात. 

ही बातमी वाचली का? शहिद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा...

महाेपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही सर्व लक्षणे आढळलेल्या महिलांची या शिबिरात प्राधान्याने तपासणी करण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून ३१ मार्च २०२० पर्यंत विविध प्रभागांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत कर्करोग निदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

तारिख                       शिबिराचे ठिकाण
१८ जानेवारी          नागरी आरोग्य केंद्र दिघा (प्र.क्र.०९), 
                          गणपतीपाडा दिघा (प्र.क्र.०३), 
                           विष्णुनगर दिघा (प्र.क्र०४) 
२५ जानेवारी          तुर्भे गांव अंगणवाडी (प्र.क्र.७२), 
                          आग्रोळी सेक्‍टर २९ समाजमंदिर (प्र.क्र.१०१), 
                          नागरी आरोग्य केंद्र नेरूळ फेज १ (प्र.क्र.८०) 
२६ जानेवारी          चंद्राबाई चौगुले शाळा चिंचपाडा ऐरोली (प्र.क्र.०७) 
२७ जानेवारी           नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांचा दवाखाना 
                           सेक्‍टर ४ सी.बी.डी. बेलापूर (प्र.क्र.१०४), 
                           नागरी आरोग्य केंद्र, करावे (प्र.क्र.११०) 
                           डॉ. डिसूजा क्‍लिनिक, खैरणे (प्र.क्र.४२) ;
२८ जानेवारी           डॉ. काटकर क्‍लिनिक, खैरणे (प्र.क्र.४३), 
                          नागरी आरोग्य केंद्र, नेरूळ फेज १ (प्र.क्र.८८) 
                          ज्येष्ठ नागरिक भवन सेक्‍टर ११ नेरूळ (प्र.क्र.९०)
२९ जानेवारी          माता बाल रुग्णालय, तुर्भे (प्र.क्र.६६), 
                           तेरणा क्‍लिनिक, तुर्भे स्टोअर (प्र.क्र.७०) 
                           नागरी आरोग्य केंद्र, चिंचपाडा (प्र.क्र.०८) 
३१ जानेवारी           रामनगर अंगणवाडी (प्र.क्र.०२), 
                           प्रबोधनकार ठाकरे विद्यालय इलठनपाडा (प्र.क्र.०५) 
                           यादवनगर बुद्धविहार (प्र.क्र.०६)

loading image
go to top