esakal | शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..

आत्महत्या केलेले अधिकारी हिमांशु रॉय यांचाही यादीत समावेश 

शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्याच्या गृह विभागाने एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या १४ अधिकार्‍यांपैकी ८ अधिकारी दिवंगत किंवा निवृत्त अधिकारी आहेत. ज्या अधिकार्‍यांना आपली मालमत्ता जाहीर करायची आहे, यामध्ये त्यात २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले अधिकारी हिमांशु रॉय यांचाही समावेश आहे. तर काही अधिकारी असेही आहेत ज्यांना आपल्या पदावरून हटवण्यात आलं आहे.

मोठी बातमी - काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? सोनिया गांधी उत्तर द्या..

आयपीएस आणि आएएस अधिकार्‍यांना आपली वार्षिक संपत्ती केंद्र सरकारपुढे स्पष्ट करावी लागते. त्यामुळेच केंद्र सरकारने राज्य सरकारला १४ अधिकार्‍यांची यादी पाठवली होती.गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही यादी राज्य सरकारला पाठवण्यात आली होती. या सर्व १४ अधिकार्‍यानी आपली संपत्ती घोषित न केल्यामुळे त्यांना राज्य सरकारने ही नोटिस पाठवली आहे.

मोठी बातमी - सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भीती ?

कोणते अधिकारी आहेत या यादीत

दिवंगत अधिकारी:

 •  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे
 •  माजी एटीएस प्रमुख हिमांशु रॉय
 •  माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय
 •  माजी पोलीस उपायुक्त आनंद मांड्या

मोठी बातमी - रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!

निवृत्त अधिकारी

 • निवृत्त आयपीएस अधिकारी भगवंतराव मोरे
 • २०१८ मध्ये लाच स्वीकारताना पकडले गेल्यामुळे नोकरी गमावलेले आपीएस अधिकारी विजय कृष्ण यादव
 • आयपीएस अधिकारी मॅरी लुई फर्नांडीस
 • २०१८ मध्ये नोकरी सोडून राजकारणात जाणारे व्ही. व्ही. लक्ष्मी नारायण

मोठी बातमी - फ़ायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

सद्यस्थितीत कार्यरत असलेले अधिकारी

 • पी.एन. रासकर
 • दलबीर सिंह भारती
 • अजय कुमार बंसल
 • पी.एन. मगर
 • अंकित गोयल
 • हिरानी ए. मोहन कुमार


मोठी बातमी - मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

आता सगळं प्रकार सॊमर आल्यानंतर, या प्रकरणात योग्य ती चौकशी केली जाईल असं गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितलं आहे. 

martyr ashok kamte gets notice from maharashtra home ministry to declare his assets  

loading image
go to top