कॅन्सरवरील बनावट औषधांची विक्री; महिलेला अटक

67 लाखांची औषधे आणि इंजेक्शन हस्तगत
fake Medicine
fake Medicinesakal media

मुंबई : नामांकित कंपन्यांच्या (reputed company) नावाचा वापर करून कॅन्सरच्या आजारावरील बनावट औषधे आणि इंजेक्शन (cancer Fake medicines) यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कंपनीच्या कल्याण येथील गोदामात छापा टाकून पोलिसांनी एका महिलेला अटक (woman arrested) केली. या गोदामातून औषधे आणि इंजेक्शनचा सुमारे 67 लाखांचा साठा हस्तगत केला. कॅन्सर रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये मोठी साखळी सक्रिय असल्याचा संशय आहे.

fake Medicine
आठ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या नोकराला अटक

जपानच्या टकेदा फार्मासिटीकल्स या कंपनीच्या मार्फत अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शन आणि इक्लूसिग या कॅन्सरवरील गोळ्यांचे उत्पादन केले जात. ही इंजेक्शन आणि गोळ्यांना प्रचंड मागणी असल्याने भारतामध्ये विशेषकरून मुंबई काही कंपन्या बेकायदा त्यांची निर्मिती करीत असल्याची तक्रार कंपनीच्या वतीने मुंबई पोलिसांकडे करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एफडीए च्या मदतीने या तक्रारीवर तपास सुरु केला. आधीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त आणि त्यात बनावट औषधे दिली जात असल्याने रुग्णाच्या जीविताशी खेळ कंपनीच्या वतीने खेळण्यात येत होता.

प्राईम हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शन आणि इक्लूसिग औषधांचा बेकायदा साठा करून त्याची विक्री करीत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. गुन्हे नियंत्रण पथकाने या कंपनीच्या कल्याण येथील गोदामामध्ये छापा टाकला. या ठिकाणी अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शनच्या जवळपास 40 लाखांच्या इंजेक्शनच्या बाटल्या आणि सुमारे 27 लाखांच्या इक्लूसिग या गोळ्यांचा साठा सापडला. पोलिसांनी हा साठा हस्तगत केला असून परवानगी नसतानाही ही औषधे आणि गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com