esakal | विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली
sakal

बोलून बातमी शोधा

विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली

सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन म्हणजेच CAPA च्या एका रिपोर्टनुसार एव्हिएशन इंडस्ट्रीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीये.

विमान प्रवाशांचा केला सर्व्हे, उत्तरं ऐकून विमान कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन म्हणजेच CAPA च्या एका रिपोर्टनुसार एव्हिएशन इंडस्ट्रीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीये. CAPA  सर्व्हेक्षणात म्हटलंय की..  

  • १० टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु झाल्यावर लगेचच परदेशात प्रवास करण्यास उत्सुक आहेत. 
  • CAPA च्या माहितीनुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना विमान तिकिटावर सूट देऊनही ते विमान तिकिटं खरेदी करणार नाहीत. ते कोरोना पूर्णपणे गेल्यानंतरच विमान प्रवासाचा विचार करतील. 
  • CAPA च्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या टप्प्यात तिमाहीत १५ ते २० मिलियन प्रवासीच विमानाने प्रवासकरतील. मागील वर्षी हेच प्रमाण तब्बल ६८ मिलियन एवढं होतं. 

मोठी बातमी - आत्महत्येच्या आधी सुशांत सिंह राजपूत इंटरनेटवर शोधात होता 'या' तीन गोष्टींची माहिती...

नॉवेल कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही थांबलंय. उद्योगधंदे, आर्थिक चक्र, या सर्वांवरच कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झालाय. पर्यंटन आणि  विमान चलन म्हणजेच एव्हिएशन इंडस्ट्रीला याचा सर्वाधिक फटका बसलाय. DGCA म्हणजेच नागरी उड्डाण संचालनालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात विमान प्रवासात ८३ टक्के घसरण झालीये. गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी कोरोनामुळे विमान प्रवास टाळत असल्याने ही घसरण असल्याचं DGCA  ने सांगितलं आहे.

CAPA ने घेतलेल्या सर्व्हेक्षणात या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देखील एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्णवण्यात आलाय. सातत्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सर्व्हेमधून खालील बाबी उघड झाल्यात. 

मोठी बातमी - सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...

प्रश्न : आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु झाल्यावर लगेच प्रवास करणार का ? 

CAPA  ने केलेल्या सेंटीमेंट्स सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु झाल्यावर लगेच प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी लगेच परदेशात प्रवास करू इच्छित नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पुढील वर्षभर अनेक प्रवासी कामानिमित्त देखील परदेशात जाण्यास उत्सुक नसल्याचं यामधून समोर आलंय. 

प्रश्न : कोणत्या अशा कारणामुळे तुम्ही परदेशातील तुमच्या आवडत्या पर्यटन स्थळाला भेट देण्यास तयार व्हाल ? 

विमान तिकिटांचे कमी झालेले दर हे सातत्याने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परदेशात प्रवास करण्यास नक्कीच उद्युक्त करतील. मात्र सध्या प्रवाशांच्या मनात सध्यातरी परदेशात गेलो तर आपल्याला कोरोनाची लागण होऊ शकते ही भीती आहे.  

मोठी बातमी -  'सत्ता गेल्यानं विरोधकांची डोकी कामातून गेली', शिवसेनेची भाजपवर घणाघाती टीका

प्रश्न : विमान तिकिटांवर सूट दिली तर प्रवास कराल का ? 

CAPA ने घेलेल्या सर्व्हेक्षणात धक्कादायक बाब समोर आली. तब्बल ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी तिकिटांचे दर कमी झालेत तरीही परदेशात प्रवास करणार नाहीत असं म्हणतायत. तर ३० ते २५ टक्के विमान प्रवासी तिकिटांचे दर कमी झाल्यास प्रवास करावा का यावर विचार करतील. मात्र हा प्रवास लगेच नसून सहा महिन्यांनी करण्याची त्यांची इच्छा त्यांनी नोंदवलीये.  त्यामुळे, तिकीट दरांमध्ये सूट जरी मिळाली तरीही विमान कंपन्या प्रवाशांना लगेच विमान प्रवास करायला उद्युक्त करू शकणार नाहीत असं या अहवालात म्हटलंय

CAPA च्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या टप्प्यात केवळ १५ ते २० मिलियन प्रवासीच विमानाने प्रवास करतील. मागील वर्षी हेच प्रमाण तब्बल ६८ मिलियन एवढं होतं. 

या सर्व्हेक्षणात असंही म्हटलंय की,  या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे भवितव्य हे कोरोनाच्या औषधावर अवलंबून आहे. येत्या काळात जलद गतीने कोरोनावर लस किंवा औषध सापडणं आणि त्यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे.

CAPA did survey to check sentiments of frequent air travelers their answers made airlines tremble