अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू: राजन विचारे

अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू: राजन विचारे

मुंबईः  ठाण्यातील घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या  लोकसंख्येमुळे वाहनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता या ठिकाणी नादुरुस्त रस्त्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला.

घोडबंदर भागातील नागरिकांना मुंबईकडे नोकरीनिमित्त तसेच खरेदीसाठी ठाणे शहराकडे  ये-जा करावी लागते. या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. तसेच मुंबईकडे ये-जा करत असताना ठाणे कोपरी पुलाचे सुरू असलेल्या कामामुळे तासनतास ठाण्यामध्ये प्रवेश करताना मनस्ताप सहन करावा लागतो. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यांची झालेली बिकट अवस्था आणि खड्ड्यांमुळे वाढणारी अपघाती मृत्यूची संख्या याची खासदार राजन विचारे यांनी दखल घेऊन नुकताच महानगरपालिकेच्या रखडलेल्या सर्व्हिस रोडची वन खाते आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून या मधील तिढा सोडविला आहे.

तसेच या परिसरातील वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थितरित्या केली जात नसल्याची बाब विचारे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनतर त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MMRDA तसेच IRB टोलचे व्यवस्थापक यांच्यासोबत पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात विचारे यांनी टाटा मोटर शेजारी आणि मुंबई दिशेस जाणारा वाघबीळ उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारा समोर दिशादर्शक फलक नव्हते. त्यामुळे वेगाने येणारी वाहने उड्डाणपूल आणि खालील रस्ता यांच्यात तफावत असल्याने याठिकाणी आदळून ट्रक उलटून अपघाती मृत्यू होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणले.

वारंवार वाहतूक शाखेकडून सांगून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करीत असल्याने विचारे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पत्र देऊन हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील साईड पट्टी खराब झाल्याने खड्डे तयार झाले आहेत. योग्यरित्या डागडुजी होत नसल्याने याठिकाणी अपघाती मृत्यूची संख्या वाढत आहे. येथे तत्काळ दखल घेऊन हे लवकरात लवकर काम मार्गी लावावे तसे न केल्यास अपघाती मृत्यू मुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनीही तात्काळ वरिष्ठांशी बोलून ही कामे येत्या 15 दिवसात पूर्ण करू असे आश्वासन दिले.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

In case of accidental death we will file a case of culpable homicide MP Rajan Vichare

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com