कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेकांवर उपचार सुरू आहेत. तर यात अनेकांचा बळी गेला आहे.

मुंबई : पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेकांवर उपचार सुरू आहेत. तर यात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोव्हिड-19 चा समावेश आता महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालकांनी काढले आहे. त्यामुळे पोलिसांसोबत त्यांच्या कुटुंबियानाही मदतीचा हात मिळणार आहे.

महत्वाची बातमी : विद्यार्थ्यांनो...! परिक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने घेतला महत्वपूर्ण निर्णय, वाचा

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेच्या अंतर्गत पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांना निर्देशित रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्याचा खर्च हा पोलीस वेल्फेअरमधून करण्यात येत होता. मात्र पोलीस वेल्फेअरच्या योजनेत कोव्हिडं-19 चा समावेश नव्हता.

नक्की वाचा : कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

दरम्यान सध्या पोलीस दलातील कर्मचारी याना कोरोनाने विळखा घातल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेत आता कोव्हिडं-19 याचा समावेश केल्याने बाधित पोलीस कर्मचारी यांच्यासह आता त्याच्या कुटुंबियानाही उपचाराचा लाभ मिळणार आहे.

In case of corona, the police will be treated immediately, covid is included in the Maharashtra Family Health Scheme


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In case of corona, the police will be treated immediately, covid is included in the Maharashtra Family Health Scheme