ताजी बातमी : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल

सुमित बागुल
Thursday, 17 September 2020

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरेकर यांच्यावर कलम १८८ कलम २६९ आणि ३४१ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सायन रुग्णालयात अंकुश नामक तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावरील कारवाईसाठी प्रवीण दरेकर यांनी सायन रुग्णालयाच्या मुख्य रस्त्यावर आंदोलन केलं होतं. १५ सप्टेंबररोजी हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदीचे आदेश धुडकावणे, कोरोना काळात संसर्गजन्य आजार फैलावण्यास कारणीभूत ठरणे या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.   

सायन रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरणी आणि अंकुश नामक तरुणाच्या मृत्यू प्रकरणी १५ सप्टेंबररोजी प्रवीण दरेकर, आमदार सिल्वम, कालिदास कोळंबकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सायन हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावर धारण आंदोलन केलं होतं.

महत्त्वाची बातमी महाराष्ट्राचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील कर्मचारीच का देतायत आंदोलनाचा इशारा ?

१५ तारखेला सकाळी १० वाजता हे आंदोलन सुरु झालेलं. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती. सुरवातीला रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या आंदोलनाची कुणी दखल घेत नाही म्हणून प्रवीण दरेकर यांनी रस्त्याच्या मध्य भागी बसून दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास आंदोलन उग्र केलेलं. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झालेला. सोशल डिस्टंसिंग चे नियम देखील धुडकावले गेले होते. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वतः प्रवीण दरेकरांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिलेली आहे.     

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरेकर यांच्यावर कलम १८८ कलम २६९ आणि ३४१ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

case lodged against vidhan parishad opposition leader pravin darekar at sion police station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case lodged against vidhan parishad opposition leader pravin darekar at sion police station