महाराष्ट्राचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील कर्मचारीच का देतायत आंदोलनाचा इशारा ?

सुमित बागुल
Thursday, 17 September 2020

मंत्रालयातील कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयातील कर्मचारी आंदोलनाचं हत्यार उपसताना पाहायला मिळतायत. 

मुंबई : मुंबईत कोरोना परत डोकं वर काढतोय का ? मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येतेय का ? असा प्रश्न विचारायची आता वेळ आलीये असं म्हंटल तर वावगं ठरू नये. कोरोनाचा रुग्ण दुपटीचा मुंबईतील कालावधी कमी होतानाही पाहायला मिळतोय. अशात महाराष्ट्राबाबत ज्या ठिकाणाहून महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, त्यांची अंमलबजावणी होते, जिथून महाराष्ट्राचं सर्व कामकाज पाहिलं जातं अशा मंत्रालयातील कर्मचारी कोरोनामुळे चांगलेच धास्तावलेत.

मंत्रालयातील कर्मचारी कोरोनाच्या दहशतीत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयातील कर्मचारी आंदोलनाचं हत्यार उपसताना पाहायला मिळतायत. 

हेही वाचा : चक्क दीड लाख रुपयांचे वीज बील; महावितरणकडून तीन हप्त्यात रक्कम देण्याची सूचना

कोरोनाच्या भीतीने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याची ताकीद  दिली आहे. वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीची अट रद्द करा नाही तर काम बंद आंदोलन केलं जाईल असं मंत्रालयातील  कर्मचारी म्हणतायत. याबाबतचा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाने दिलाय.

मंत्रालयात कोरोनाची बाधा झाल्याने पाच मंत्र्यांची कार्यालये बंद आहेत. मंत्रालयात कुणालाही यायचं असल्यास त्यांची केवळ थर्मामीटर गन ने तपासणी केली जाते. मात्र तसं न करता कोरोना निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट असेल तरंच मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा अशीही मागणी करण्यात येतंय. मंत्रालयात येत जाताना सोशल डिस्टंसिंग नियमांचं पूर्णतः पालन व्हावं अशीही मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने  केलीये. 

mantralaya workers are in fear of corona planning an agitation against full attendance policy


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mantralaya workers are in fear of corona planning an agitation against full attendance policy