अभिनेत्री राखी सावंत आणि त्यांच्या वकीलाविरूद्ध आंबोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant and sherlyn chopra

अभिनेत्री शर्लिन चोप्राने गुरूवारी 10 नोव्हेंबरला मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेत्री राखी सावंत आणि त्यांच्या वकीलाविरूद्ध आंबोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

मुंबई - अभिनेत्री शर्लिन चोप्राने गुरूवारी 10 नोव्हेंबरला मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा गुरूवारी आंबोली पोलीस ठाण्यात पोहोचत राखी सावंतवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. शर्लिन चोप्राने राखी सावंतवर खोटे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा आरोप केला आहे. आंबोली पोलिसांच्या माहितीनुसार, शर्लिनने राखीविरुद्ध कलम 354-A, 500, 504, 509, 67A आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी राखी सावंतने शर्लिन चोप्रावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

गेल्या काही दिवसांपासून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शर्लिन चोप्राने उद्योगपती राज कुंद्रा आणि चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचवेळी राखी सावंत या दोघांचा कथित बचाव करताना दिसली आहे. राखीने शर्लिनवर ‘सेक्स्टॉर्शन’ केल्याचा आरोप केला आहे.

साजिद खानला पाठिंबा देताना राखी सावंतने शर्लिनच्याविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक विधाने केल्याचा शर्लिनचा दावा आहे. या संदर्भात शर्लिनने राखी आणि तिची वकिल फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध बदनामीसह अनेक आरोपांखाली वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात खटले दाखल केले आहेत. याबाबतची ताजी तक्रार बुधवारी, 9 नोव्हेंबर रोजी आंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. तर दुसरीकडे राखी राखीसोबत शर्लिनचे कोणतेही वैर नसल्याच शर्लिन चोप्राने स्पष्ट केले आहे. मात्र, हे सर्व बोलत असताना शर्लिनबद्दल राखी सावंतने केलेल्या वक्तव्यावर तिचा आक्षेप आहे.