Viral Cat Video | मांजरीला मारहाण करून पोत्यात भरलं, Video व्हायरल झाल्यानंतर तिघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai cat viral video

मांजरीला मारहाण करून पोत्यात भरलं, Video व्हायरल झाल्यानंतर तिघे ताब्यात

मुंबईत एका सोसायटीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्याचं प्राणीमित्रांनी भुवया उंचावल्या आहेत. वरळीतील न्यू म्हाडा टॉवर, जनतामधील 3 व्यक्तींनी 5 मे रोजी रात्री बिल्डिंगमधून एका मांजरीला क्रूरपणे पकडून अज्ञात स्थळी नेलं. यावेळी मांजरीला मारहाणही झाली. तिचा छळ करून पोत्यात टाकल्याचं सीसीटीव्ही फूटेज मिळालं आहे.

यामध्ये हेमंत शहा, जय लबडे आणि सुशांत सावंत नावाच्या व्यक्ती स्पष्टपणे दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या 3 व्यक्तींनी सोसायटीमधील भटक्या मांजराला पकडून प्लास्टिक पिशवीत टाकलं. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात खुलासा देखील केला आहे.

अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ), प्लांट प्लांट अँन्ड अनिमल्स वेलफेयर सोसायटी - मुंबई (पीएडब्ल्यूएस-मुंबई) आणि आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संस्था (ओआयपीए) यांनी संयुक्तपणे 9 मे 2022 रोजी सोमवारी विक्रोळी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Cat Kidnapping Video Goes Viral From Vikroli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Crime
go to top