

CGST officer arrest in bribe case
ESakal
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी (ता. २७) जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक केली. दगड खाणीच्या स्वामित्व धनासोबत जीएसटी रक्कम माफ करण्याच्या मोबदल्यात आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे दीड कोटींची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४० लाख रुपये घेताना त्यांना अटक केल्याचे सीबीआय प्रवक्त्याने सांगितले.