esakal | CBI ची टीम तब्बल ६ तासाहून अधिक काळ होती सुशांतच्या घरी, नेमकं काय घडलं तपासात
sakal

बोलून बातमी शोधा

CBI ची टीम तब्बल ६ तासाहून अधिक काळ होती सुशांतच्या घरी, नेमकं काय घडलं तपासात

शनिवारी सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुमारे सहा तासाहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी फ्लॅटबरोबरच पूर्ण इमारतीचा परिसर, टेरेसचा तपास करुन नोंदी केल्या.

CBI ची टीम तब्बल ६ तासाहून अधिक काळ होती सुशांतच्या घरी, नेमकं काय घडलं तपासात

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. शनिवारी सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. टीमनं  वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटची कसून तपासणी केली. सुमारे सहा तासाहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी फ्लॅटबरोबरच पूर्ण इमारतीचा परिसर, टेरेसचा तपास करुन नोंदी केल्या. सीबीआयच्या टीमनं सीन ऑफ क्राईम रिक्रिएट केला आहे.  यावेळी सीबीआयनं सिद्धार्थ पिठानी, दीपेश आणि नीरज यांना सोबत आणलं होतं. घटना घडली त्यावेळी सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज सुशांतसोबत उपस्थित होते.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक तपासही सुरु आहे. १४ जूनला घटना कशी घडली याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुशांतच्या वजनाचा पुतळा आणून सीबीआय अधिकाऱ्यांनी घटनेचं नाट्य रुपांतर करुन घटना समजून घेतली. यात सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? ६ फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे.

सीबीआयचे अधिकारी गेल्या २ दिवसांपासून सुशांतचा कूक नीरज सिंग याची चौकशी करत आहेत. शुक्रवारी सीबीआयच्या टीमनं नीरजची जवळपास १४ चौकशी केली. यावेळी ४० पानांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला.

हेही वाचाः  सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्यांकडून मोठा खुलासा; 'त्या' दिवशी नेमकं काय झाले, वाचा सविस्तर

तसंच सीबीआयची टीम बांद्रा पोलीस ठाण्यात जाऊन तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना सोबत घेऊन सुशांतच्या मृतदेहाच शवविच्छेदन केलेल्या कूपर रुग्णालयात पोहचले.  त्याचे पीएम रिपोर्ट घेऊन त्यादिवशी त्या कक्षात ड्युटी असलेल्या आणि शवविच्छदन करणाऱ्याचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले.

त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पथक सुशांत राहात असलेल्या सोसायटीत गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत सिद्धार्थ पिठाणी, त्याचा  स्वयंपाकी नीरज आणि दीपेश यांनाही सोबत घेण्यात आले. पूर्ण इमारत, आजूबाजूचा परिसर आणि टेरेसची सूक्ष्म पाहणी करण्यात आली. यावेळी पूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

अधिक वाचाः 'तलाव आपल्या घरी'! वसईत 72 फिरत्या कृत्रिम तलावांच्या माध्यमातून होणार बाप्पाचे विसर्जन

सीबीआयच्या पथकाकडून होत असलेल्या सर्व तपासाचे व्हिडीओ शुटींग घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून फ्लॅटमधील प्रत्येक आवश्यक बाब, वस्तूची तपासणी केली जात होती. त्याचे अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. त्याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.

CBI spending more than Six hours Sushant Singh Rajput house

loading image
go to top