मोठी बातमी! 'सीबीआय'च्या पथकाला क्वारंटाईनमधून सूट मिळण्याची शक्यता? वाचा सविस्तर

समीर सुर्वे
Thursday, 20 August 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्य प्रकरणात चौकशीसाठी सीबीआयच्या पथकाला 14 दिवसांच्या होम क्वारंटाईन मधून सुट मिळण्याची शक्‍यता आहे

मुंबई :अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्य प्रकरणात चौकशीसाठी सीबीआयच्या पथकाला 14 दिवसांच्या होम क्वारंटाईन मधून सुट मिळण्याची शक्‍यता आहे.सीबीआय कडून महापालिकेला ईमेल व्दारे अर्ज करण्यात आला आहे.त्यामुळे आता पालिकेकडून परवानगी दिली जाण्याची शक्‍यता आहे.

सुशांतसिंह राजपूत मृ्त्यू प्रकरण! CBI चे पथक तपासासाठी मुंबईत दाखल

केंद्र व राज्य सरकारच्या नियमानुसार परराज्यातून येणाऱ्या विमान प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. जर, संबंधीत व्यक्ती कामानिमीत्त 7 दिवसांसाठी येणार असेल अथवा सरकारी अधिकारी शासकीय कामासाठी 7 दिवसां पेक्षा जास्त काळ मुंबईत राहाणार असतील त्यांना पुर्व परवानगी तून होम क्वारंटाईन मधून सुट मिळू शकते. त्यासाठी महापालिकेकडे ईमेलवरुन अर्ज करावा लागतो.सीबीआय कडून असा अर्ज पालिकेला आला असल्याचे समजते.त्यानुसार पालिकेला ही परवानगी द्यावी लागणार आहे.

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI team likely to get quarantine relief? Read detailed