esakal | सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ?
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ?

आज केली जाणारी चौकशी संपूर्णपणे ऑन रेकॉर्ड असणार आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI कडून थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण. काल केंद्रीय तपास पथक मुंबईत दाखल झालंय. काल CBI ची टीम मुंबईत आल्यानंतर संपूर्ण CBI ची टीम ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळतेय. सीबीआयने वेगवेगळी पथकं बनवली आहेत. ही सर्व पथक विविध बाबींचा तपास करणार आहे. 

दरम्यान आज सुशांत सिंह राजपूत प्रकरणात CBI ची एक टीम थेट मुंबई पोलिसांचीच चौकशी करतेय असं सूत्रांकडून समजतंय. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतच्या घरी कोण कोण अधिकारी गेलेत, त्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्यावेळी घटनास्थळी काय काय पाहिलं, या आणि अशा अनेक विषयांवर CBI ची एक टीम मुंबई पोलिसांची चौकशी करत असल्याचं असल्याचं समजतंय. साधारण दुपारी साडे बारा ते एक वाजेपासून CBI ची टीम मुंबई पोलिसांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजतंय. 

महत्त्वाची बातमी - "एक तरुण नेता CBI समोर स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं समजतंय"

आज केली जाणारी चौकशी संपूर्णपणे ऑन रेकॉर्ड असणार आहे. या माहितीच्या आधारेच CBI ची टीम या प्रकरणाचा तपास करणार असल्याचंही समजतंय.

या सोबतच सुशांतचा कुक नीरज याचीही चौकशी केली जातेय. या केसमधील मुख्य आरोपी सॅम्युअल मिरांडा याचीही मुंबईच्या मरोळ भागात चौकशी केली जातेय. केंद्रीय तपास पथकाकडून केला जाणारा तपास हा विविध दिशांनी एकाच वेळी केला जातोय.  

cbi team speaking with mumbai police since last five hours to take detail information 

loading image