ZP Schoolsakal
मुंबई
ZP School: झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर, लवकरच कामाला होणार सुरुवात
Thane News: ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून झेडपीच्या एक हजार ३२८ शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कामाचे कार्यादेश देण्यात येणार आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यात या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबधित राहो, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून झेडपीच्या एक हजार ३२८ शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.