Mumbai Local Update: रुळांवरील प्रत्येक क्षण होणार रेकॉर्ड, मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क!
Local Train Safety: मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात अधिक सतर्क झाले आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंब्रा स्थानकाजवळ नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात अधिक सतर्क झाले असून, धावत्या लोकलच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.