गणेशपुरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा

दीपक हीरे 
शुक्रवार, 27 जुलै 2018

वज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी या स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आज पहाटे पासून, गुरुपौर्णिमे निमित्त भविकनी मोठी गर्दी केली होती व मनोभावे दर्शन घेउन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

वज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी या स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आज पहाटे पासून, गुरुपौर्णिमे निमित्त भविकनी मोठी गर्दी केली होती व मनोभावे दर्शन घेउन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज समाधि मंदिरात आज पहाटे पासून भविकानी मोठ्या संख्येने गर्दी केली आज गुरुपौर्णिमा असल्याने येथे देश भरातून गुरुदर्शनसाठी भाविक दाखल झाले होते. श्री भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थान ने भविकाना सुलभ दर्शन घेता यावे व गर्दी होउ नये म्हणून थेट समाधि गाभरा दर्शन व्यवस्था केली होती.दरम्यान आज पहाटे बाबांचे महाभिषेक व अखंड हरीनाम सप्ताहने गुरुपौर्णिमा उत्सवास सुरुवात करण्यात आली. या वेळी मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते, तर दिवस भरातून ठिकठिकनहुन लाबुन पालखी पदयात्री येत होते, भविकना पावसाचा त्रास होउ नये म्हणून मंदिर संस्थान ने ठिकठिकाणी मोठे मंडप, तड़पत्री शेड उभरण्यत आले होते त्यामुळे येणाऱ्या भविकास शिस्तब्ध पद्धतीने दर्शन घेता आले, गणेशपुरी येथे आज विविध धार्मिक कार्यक्रमची रेलचेल सुरुच होती. गुरुभक्त साठी महाप्रसाद, भंडारा ठेवण्यात आला होता या वेळी हजारोच्या संखेने भाविक गणेशपुरी मध्ये उपस्थित होते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र शेनॉय, परशुराम सावंत, जोशी, शरद पवार आदिनी दिली तर संस्थान च्या सर्व विश्वस्तनी भविका साठी विशेष सोय केली होती ढोल ताशाच्या गजरात गणेशपुरी ते शिवाजी चौक अशी नित्यानंद बाबांची भव्य पालखी मिरवणूक काढून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गणेशपुरी पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यानी मोठा बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था सुरलित ठेवली होती.

Web Title: Celebration of gurupornima festival in Ganeshpuri