esakal | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दाखवला स्वतःचा हक्क; पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र सामना?
sakal

बोलून बातमी शोधा

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दाखवला स्वतःचा हक्क; पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र सामना?

पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आरे मधील मुंबई मेट्रो ३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवण्याची घोषणा केली

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दाखवला स्वतःचा हक्क; पुन्हा राज्य विरुद्ध केंद्र सामना?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : पर्यावरणाच्या कारणामुळे आरेतील मुंबई मेट्रो ३ चं कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवत असल्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव यांनी घोषणा केली. आरेतील जागेऐवजी कांजूरमार्ग जागेची घोषणा झाली खरी मात्र आता कांजूरमार्ग जागेवर केंद्र सरकारने आपला हक्क असल्याचा दावा केलाय.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून कांजूरमार्गची जागा MMRDA ला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. हे आदेश रद्द करावे असं केंद्राकडून आता राज्याला सांगण्यात आल्याचं काही माध्यमांमधील बातम्यांमधून समजतंय. सोबतच या जागेवरील प्रकल्पही रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्याचं समजतंय. त्यामुळे मेट्रो ३  प्रकल्पावरून केंद्र विरुद्ध राज्य असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार विभागाने राज्य सरकारला एक पत्र पाठवलं आहे आणि  या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा केलाय. 

महत्त्वाची बातमी : कोरोनाबाधितांना होऊ शकतो फटाक्यांच्या धुराचा त्रास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे

या जागेचा नेमका वाद आहे तरी काय ? 

पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी आरे मधील मुंबई मेट्रो ३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये हलवण्याची घोषणा केली. त्यानंतर कांजूरमार्गची जागा काहीही खर्चाविना आपल्याला मिळत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. दरम्यान केंद्राकडून राज्याच्या मुख्य सचिव यांना एक पत्र देखील लिहिलं गेलं आहे. यामध्ये कांजुरची जागा मिठागराची आहे असं नमूद केलं गेलं आहे. मिठागराची जागा म्हणजे, ती जागा केंद्राची असल्याचं राज्याला सांगण्यात आलंय. या केंद्राच्या जागेवर परवानगीशिवाय कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही. दरम्यान राज्याने MMRDA ही जागा हस्तांतरित केलेली आहे. ही जागा MMRDA ला देण्याचा प्रस्ताव रद्द करावा आणि तिथे होणारा कारशेड चा प्रकल्प रद्द करावा असं केंद्राकडून आलेल्या पत्रात म्हंटलं आहे. मेट्रो ३ आणि मेट्रो ६ चं एकत्रित कारशेड कांजूरमार्ग च्या जागेवर करण्याचं प्रस्तावित आहे. 

center has claimed the kanjurmarg metro carshed site land