
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे शनिवारी रात्री ब्लॉक घेणार असल्याने रविवारी (ता.२२) दिवसा कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.