

mumbai Local Train
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईची उपनगरी रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदलणार आहे. वाढती प्रवासीसंख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि वारंवार होणारा विलंब या समस्यांवर उपाय म्हणून मध्य व पश्चिम रेल्वेकडून १८ हजार ३६४.९४ कोटी रुपयांचे तब्बल ४००.५३ किलोमीटर लांबीचे विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प आगामी काही वर्षांत पूर्ण होणार असून, त्यामुळे उपनगरी लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या आणि वेळपालनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. परिणामी मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.