गॅस सिलिंडर वाढीचा गृहिणींना आर्थिक फटका; हॉटेल व्यावसायिकही हैराण | central government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gas cylinder

गॅस सिलिंडर वाढीचा गृहिणींना आर्थिक फटका; हॉटेल व्यावसायिकही हैराण

चेंबूर : कोरोनाच्या काळात (corona) हाताला काम नसल्याने सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात उपासमार सोसावी (financial crisis) लागली. त्यात आता तर ऐन दिवाळीच्या तोंडावर (diwali festival) केंद्र सरकारने (central government) एलपीजी सिलिंडरच्या (lpg cylinder) किमतीमध्ये वाढ (price increases) केल्याने गृहिणींना आर्थिक फटका बसला आहे. शहरातील हॉटेल व्यावसायिकही हैराण झाले आहेत.

हेही वाचा: डोंबिवली : सोन्याचे नकली बिस्कीट देऊन रिक्षाचालकाची फसवणूक

मुंबई शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने सामान्य नागरिकांच्या हाताला काम नव्हते. आता कुठे संसाराची गाडी रुळावर येत होती. अचानक सिलिंडरच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. ऐन दिवाळीच्या सणासुदीला केंद्र सरकारने पुन्हा किमतीत भरमसाट वाढ केली आहे. सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत एकूण ८९९.५० आहे; तर व्यावसायिक गॅस सिलिंडर किंमत १९५०.५० वर पोहोचली आहे.
या दरवाढीच्या भडक्यामुळे सामान्य गृहिणींच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे.

"दिवाळी सण असताना गॅस सिलिंडरची वाढ करता कामा नये. चार महिन्यांत एकूण ४०० ते ६०० रुपये वाढ करण्यात आली आहे. लहान चहाची टपरी असेल तर एक किंवा दोन गॅस सिलिंडर लागतात. मोठ्या उपाहारगृहात दिवसाला एकूण पाच ते सहा सिलिंडरची मागणी असते. सतत पदार्थांची भाववाढ करू शकत नाही. दिवाळीत थोडाफार धंदा आहे, परंतु कोणत्याही मालकाला फायदा होत नसून तोटा सहन करावा लागत आहे."

- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार उपाहारगृह असोसिएशन

"गॅस दरवाढीचा परिणाम होत आहे. गॅसचा दर कमी होईल या आशेवर आहोत. सहा महिन्यांनंतर आम्ही मेनूचे भाव वाढवतो. कोरोनाने हैराण झालो आहे. त्यातच गॅसची किंमत वाढत असल्याने कंबरडे मोडणार यात शंका नाही."
- श्रीनाथ पैयाडे, सद्‍गुरू उपाहारगृह

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Central Government
loading image
go to top