पीएनबी, एनएफडीबी यांच्यात करार, मत्स्यशेतीसाठी आर्थिक सहाय्य

 Fish production
Fish production sakal media

मुंबई : केंद्र सरकारच्या (central government) राष्ट्रीय मत्स्योत्पादन विकास महामंडळाने (NFDB) पंजाब नॅशनल बँकेशी (Punjab national bank) सामंजस्य करार (agreement) केला आहे. या कराराअंतर्गत मत्स्योत्पादन, मत्स्यशेती (fish production) यासाठी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य (finance) देण्यात येईल. केंद्र सरकारने सन 2018 मध्ये 7,552 कोटी रुपयांचा मत्स्योत्पादन आणि जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी (FIDF) स्थापन केला आहे. यात नाबार्ड, एनसीडीसी आणि सर्व शेड्युल बँकांनी उभारलेल्या 5,266 कोटी रुपये निधीचा समावेश आहे.

सरकारतर्फे प्रायोजित, साहाय्य प्राप्त झालेल्या संस्था, मत्स्योत्पादन सहकारी महासंघ, सहकारी संस्था, मत्स्यशेती करणाऱ्यांचे सामुहिक गट आणि मत्स्योत्पादन गट इ. पंचायत समित्या / बचत गट / एनजीओ, अनुसूचित जाती /अनुसूचित जमाति / मागास शेतकरी, महिला व छोटे उद्योजक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती यांना याद्वारे साह्य मिळू शकते. मासेमारी आणि मत्स्यपालन, मत्स्योत्पादनाच्या पायाभूत सुविधा तयार करणे तसेच आधुनिकीकरण, सागरी मत्स्योत्पादन, अंतर्देशीय मत्स्योत्पादन वाढवणे, मत्स्योत्पादनानंतर होणारे नुकसान कमी करणे आणि स्थानिक बाजारपेठेच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे तसेच विद्यमान पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे यासाठी एफआयडीएफ मदत करेल.

 Fish production
कळव्यात सहा घरांवर कोसळली दरड; 25 कुटुंबांचे स्थलांतर

पीएनबीशी सामंजस्य करार केल्यामुळे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या (पीएमएमएसवाय) अंतर्गत कर्जे घेऊन मत्स्योत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी त्याचा फायदा होईल, असे एनएफडीबीच्या मुख्य कार्यकारी डॉ. श्रीमती सुवर्णा म्हणाल्या. एफआयडीएफ आणि पीएमएमएसवाय योजनांच्या अंतर्गत बँक फंडिंगसाठी ही कर्जकेंद्रे एनएफडीबीशी सहकार्य करतील, असे पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव म्हणाले.

देशभरातून एनएफडीबीकडे आलेल्या तांत्रिक मंजुरी मिळालेल्या प्रस्तावांसाठी हैदराबादचे झोनल ऑफिस हे शिखर कार्यालय असेल. एनएफडीबीच्या मुख्य कार्यकारी डॉ. (श्रीमती) सुवर्णा चंद्रप्पागरी, पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राव, कार्यकारी संचालक (इन्फ्रा) एम. अरुल बॉस्को प्रकाश, पीएनबीचे महासंचालक आणि झोनल प्रमुख संजीवन निखार आणि पीएनबी हैदराबादच्या क्रेडिट विभागाचे प्रमुख आणि नोडल इनचार्ज रजनिश कुमार यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com