

samagra Shiksha scheme 2.0
ESakal
मुंबई : केंद्राकडून राबविण्यात आलेल्या समग्र शिक्षा अभियानाची मुदत ३१ मार्चला संपली. त्यासाठी कार्यरत असलेल्या तीन हजार ७५२ कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ ओढवली होती. मात्र, त्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्राकडून समग्र शिक्षा मुदत वाढ किंवा २.० ही सुधारीत योजना राबवण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे ३१ मार्चपासून हवालदिल झालेल्या कंत्राटी, बाह्य संस्थेकडून सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.