esakal | लाखो वाहनांच्या फिटनेसचे परिवहन विभागापुढे आव्हान | RTO
sakal

बोलून बातमी शोधा

RTO

लाखो वाहनांच्या फिटनेसचे परिवहन विभागापुढे आव्हान

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कालबाह्य होणाऱ्या वाहनांच्या (vehicle) कागदपत्रांना (Documents validity) एक महिन्याची मुदतवाढ (extension) दिली आहे. त्यामुळे वाहन परवान्यासह (license) अन्य कागदपत्रांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत मिळाली आहे. कोरोनामुळे (corona) ५० टक्के क्षमतेनेच कर्मचारी-अधिकारी उपस्थित असल्याने आरटीओ कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक अनफिट वाहनांची संख्या जास्त त्याचे आव्हान परिवहन विभागापुढे आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाहन परवाना आणि इतर कालबाह्य कागदपत्रांना मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी सरकारने प्रथम सप्टेंबर २०२०, त्यानंतर ३१ डिसेंबर २०२०, ३१ मार्च २०२१, ३० जून २०२१, ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती; मात्र आता एक महिन्याची म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक परिवहन विभागाने जारी केले आहे.

लाखो वाहनांचे फिटनेस शिल्लक

दरम्यानच्या काळात आरटीओ विभागाला अनफिट वाहनांचे फिटनेस करावे लागणार आहे. त्यासाठी सध्या परिवहन विभाग शनिवारी आणि रविवारीही वाहनांच्या तपासणीचे काम करत असून, महिनाभरात राज्यभरातील लाखो वाहनांचे फिटनेस पूर्ण करावे लागणार आहे; अन्यथा रस्त्यावर अनफिट वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

loading image
go to top