'सीटबेल्ट अलार्म' बंद करणारे उपकरण विकणाऱ्या कंपन्यांना दणका; केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण निर्देश

seatbelt
seatbelt

मुंबई : मोटारीच्या चालकाने व शेजारील सहप्रवाशाने सीट बेल्ट न लावल्यास मोटारीत वाजणारा अलार्म बंद करण्यासाठी वापरण्याच्या उपकरणाची जाहिरात आणि विक्री केल्याबद्दल केंद्र सरकारने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मीशो, स्नॅपडील व शॉपक्यूज या पाच बड्या ई-कॉमर्स कंपन्यांना त्या उपकरणांची विक्री आणि जाहिराती बंद करण्यास सांगितले आहे.

seatbelt
Mumbai Crime : कामावर जाऊ नको सांगूनही पत्नी कामावर निघाली; माथेफिरू पतीने भर रस्त्यातच...

केंद्राच्या आदेशानंतर अशा एकूण १३,११८ जाहिराती मागे घेण्यात आल्या, त्यातील सुमारे आठहजार ॲमेझॉनच्या तर फ्लिपकार्टच्या चार ते पाच हजार जाहिराती विविध ठिकाणी होत्या. हल्ली मोटारीत बसल्यावर चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे कायद्यानुसार सक्तीचे आहे.

अनेक आधुनिक नव्या मोटारीत प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नाहीत तर अलार्म वाजत राहतो. प्रवाशांनी सीट बेल्ट न लावता देखील हा अलार्म वाजू नये किंवा तो बंद व्हावा यासाठी काही विशिष्ट उपकरणे तयार करण्यात आली आहेत. या उपकरणांची जाहिरात आणि विक्री या ई-कॉमर्स कंपन्यांनी केली होती.

seatbelt
Shiv Sena Case : 'विधानसभाध्यक्ष स्वतः वकील आहेत, त्यांच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर…'

सीट बेल्ट न वापरल्याचा अलार्म बंद करणारी ही उपकरणे प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी असून त्यांची विक्री व जाहिरात ही अनुचित व्यापार प्रथा (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस) या सदरात मोडते असा ठपका केंद्र सरकारने ठेवला होता. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग झाल्याबद्दल ही कारवाई केली आहे. अशा प्रकारची उपकरणे लावलेल्या मोटारीस दुर्दैवाने अपघात झाल्यास प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेले नसल्यामुळे त्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात असेही प्राधिकरणाने म्हटले आहे.

कदाचित अशी उपकरणे वापरून सीटबेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांना अपघाताची नुकसानभरपाई देखील मिळणे अशक्य होईल. कारण प्रवाशांच्या हलगर्जीपणाचे कारण देऊन विमा कंपन्या त्यांना नुकसानभरपाई नाकारण्याची शक्यता आहे.

seatbelt
Chitra Wagh : "उद्धवजी त्याच दिवशी मविआचा पोपट मेला…" अजित पवारांचा सोनार उल्लेख करत चित्रा वाघ यांची टीका

मुख्य म्हणजे ही उपकरणे वापरल्याने प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेले नसल्यास अपघातात प्रवासी इतरत्र फेकले जाण्याची शक्यता असते व एअरबॅग देखील न उघडल्या जाण्याची शक्यता असते. सिगरेट लायटर किंवा बॉटल ओपनर च्या नावाखाली देखील अशी उपकरणे विकली जात असल्याचे आढळून आले होते.

या उपकरणांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांची माहिती देण्यासही या ई-कॉमर्स कंपन्यांना सांगण्यात आले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये सीटबेल्ट न लावल्यामुळे देशात सोळाहजार व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यातील निम्म्याहून जास्त चालक होते. तर अशाच अपघातात ३९ हजार लोक जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com