esakal | शंभर किलोमीटरचे सायकलिंग; नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Cycling

शंभर किलोमीटरचे सायकलिंग; नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी उपक्रम

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : आरोग्याची काळजी ,सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम (Exercise) आणि सायकलिंगचे (cycling) महत्व पटवून देण्यासाठी शतक महोत्सवी वर्षानिमित्त नायर रुग्णालयातील (Nair hospital) डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी (doctors and employees) शंभर किलोमीटरचा सायकलिंग करून जनजागृती केली. नायर रुग्णालय - गेटवे ऑफ इंडिया - दहिसर ते नायर रुग्णालय अशा मार्गावर हे सायकलिंग करण्यात आले.

हेही वाचा: मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विळखा? रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ

ब्रिटिशकालीन 4 सप्टेंबर 1921 रोजी स्थापन झालेल्या नायर रुग्णालयाला 4 सप्टेंबर 2021 रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. सर्वसामान्य रुग्णांची अविरत सेवा करता करता कोरोना महामारीच्या या संकटात सुद्धा नायर रुग्णालयाने संपूर्ण रुग्णालय कोरोना सेंटर बनवून रुग्णांना उत्तम प्रकारे सेवा दिली आहे. या शतक उत्सवाचा भाग म्हणून नायर रुग्णलयाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्याचाच भाग म्हणून 5 सप्टेंबर रोजी नायर वासियांनी शंभर किलोमीटरचा सायकलिंग कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. यामध्ये डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी यांनी उत्साहपूर्वक भाग घेतला. सायकलींगच्या या कार्यक्रमाला नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. धारप, उप अधिष्ठाता डॉ. राणा आणि चिफ कोऑर्डिनेटर डॉ. कुमार दुस्सा यावेळी उपस्थित होते.

शंभर किलोमीटर सायकलिंगमध्ये नायरचे 17 सायकल स्वार सहभागी झाले होते. मुंबई शहरातील नायर रुग्णालय - गेटवे ऑफ इंडिया - दहिसर ते परत नायर रुग्णालय अशा सायकलच्या या 100 किलोमीटरच्या मार्गावर मुंबई पोलिसांचे खूप मोठे सहकार्य लाभले. शारीरिक तंदुरुस्ती साठी सायकलिंगचे महत्व पटवून देत तसेच कोरोना महामारी मध्ये नागरिकांना मास्क वापरण्याचा व लस घेण्याचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.डॉ. कुमार दुस्सा यांनी सांगितले.

loading image
go to top