
Karjat division Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत रेल्वे यार्डच्या पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे कर्जत विभागात १९ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती समोत आली आहे. परिणामी अनेक गाड्या रद्द करण्यात येणार असून नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे.