Thane Rail Chaos : ठाणे स्थानकावर कोकण प्रवाशांची १२-१५ तास प्रतीक्षा; ‘रांगेत घुसवण्यासाठी पैसे’ घेतल्याचा रेल्वेचा दावा

ठाणे स्थानकावर कोकणगाड्यांसाठी १२-१५ तास रांगा; ‘रांगेत घुसवण्यासाठी पैसे’ घेतल्याचा रेल्वेचा गंभीर आरोप, प्रवासी संघटनेचा इन्कार; महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Konkan Travel Woes: Passengers Wait 12 Hours at Thane Railway Station

Konkan Travel Woes: Passengers Wait 12 Hours at Thane Railway Station

Sakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकावर कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांसाठी प्रवाशांना १२ ते १५ तास रांगेत थांबावे लागत असताना, प्रवाशांना रांगेत घुसवण्यासाठी पैसे घेतले जात होते, असा गंभीर दावा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळकडे केला आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हा आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com