

Lonavala-Karjat Ghat Repairs Impact Rail Travel; 13 Trains Cancelled, 20 Diverted
sakal
मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागातील तिसरी मार्गिका पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने १८ ते २४ जुलैदरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. या कालावधीत १३ एक्सप्रेस गाड्या रद्द, तर २० एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दोन गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन आणि दोन गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे ३७ एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.