

Freight Train Brake Failure
ESakal
मुंबई : लोणावळा घाटातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने ती उतारावरून वेगाने धावू लागली. पळसदरी ते कर्जत स्थानकादरम्यान काही काळ गाडीवरील नियंत्रण लोको पायलटचे सुटल्याने मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत गाडीला कर्जत स्थानकात सुरक्षितपणे थांबवण्यात यश मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.