
मुंबई : गणेशोत्सवानिमित्य गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते नागपूर या मार्गावर दोन विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या २५ व २६ ऑगस्ट रोजी धावणार असून, यामुळे विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.