

Mumbai Local
मुंबई : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २० लोकल गाड्या १२ डब्यांवरून १५ डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ४.६७ कोटींची निविदा काढण्यात आली आहे.