Matheran Mini Train
ESakal
मुंबई
Matheran Mini Train: पावसामुळे परंपरेला ब्रेक! 'माथेरानची राणी' नोव्हेंबरपासून धावणार
Central Railway: माथेरान परिसरात यंदा पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिनीट्रेन धावण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत : नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा यंदा उशिरा सुरू होणार आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा जास्त लांबल्याने, दुरुस्तीची कामे अद्यापही झालेली नसल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिनीट्रेन धावण्याची शक्यता मध्य रेल्वेने व्यक्त केली आहे.

