

Central Railway Special Power Block
ESakal
मुंबई : पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने सात दिवस विशेष पॉवर आणि ट्राफिक ब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. २२ ते २९ नोव्हेंबरपर्यंत दररोज मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.०५ या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येईल. या कामाचा परिणाम कर्जत मार्गासह दिवा-वसई-रोहा-पनवेल विभागातील रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या मार्गातच थांबवून ठेवण्यात येणार असून, काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत आणि मार्गात बदल करण्यात आला आहे.