Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

Central Railway: परिचालन विभागाने मोटरमनला ट्रेसपासिंगची शक्यता असलेल्या ठिकाणी लोकल जात असताना वारंवार हॉर्न वाजवून रूळ ओलांडणाऱ्यांना सावध करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
Mumbai Local News

Mumbai Local News

esakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या अर्थात ट्रेसपासिंगच्या घटना वाढत असल्याने मोटरमनकडून हॉर्नचा वापर वाढला आहे. ट्रेसपासिंगची शक्यता असलेल्या ठिकाणी लोकल जात असताना वारंवार हॉर्न वाजवून रूळ ओलांडणाऱ्यांना सावध करावे, अशा सूचना परिचालन विभागाने दिल्या आहेत. रुळावर व्यक्ती आढळल्यास संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी लोकलचा वेग कमी करावा लागतो किंवा प्रसंगी ती थांबवावी लागते. परिणामी लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होऊन सेर्वांना विलंब होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com