
मुंबई : कॅन्स लायन्ससारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारी ‘लकी यात्रा’ मोहीम मुंबईतील उपनगरी रेल्वेत मात्र अपयशी ठरली. मध्य रेल्वे आणि एफसीबी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेली ही योजना केवळ तीन विजेतेच देऊ शकली आणि तिकीटखरेदीत काहीही वाढ न झाल्याने अखेर योजना बंद करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर आली.