

Railway ticket checking
Esakal
मुंबई : विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मोठा दणका दिला आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत तिकीट तपासणी पथकांनी चार लाख ३० हजार प्रकरणे उघडकीस आणून ३० कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.७५ लाख प्रकरणांतून १२ कोटी दोन लाख रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे दंडवसुलीत १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.